अल्पवयीन मुलीचा विवाह लावल्याप्रकरणी ७ जणांविरुद्ध गुन्हा

0

भडगाव ;-तालुक्यातील एका गावात एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने विवाह लावल्या प्रकरणी ७ जणांविरुद्ध भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की पाचोरा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या 17 वर्षीय मुलीचा विवाह समाधान संतोष सोनवणे याच्याशी 23 नोव्हेंबर 2021 रोजी लावण्यात आला होता. मात्र मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असून सुद्धा तिच्याशी लग्न करण्यास भाग पाडल्याप्रकरणी आरोपी नितीन यशवंत वाघ ,दिपाली नितीन वाघ, दोघे रा. ता. पाचोरा, संतोष गेंदा सोनावणे, निर्मला संतोष सोनवणे, समाधान संतोष सोनवणे, प्रीतम संतोष सोनवणे ,पूजा प्रीतम सोनवणे ,सर्व रा.ता. भडगाव यांच्याविरुद्ध फिर्यादी अल्पवयीन मुलगी हिच्या फिर्यादीवरून ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजता बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 चे कलम 9 , 11 प्रमाणे भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.