लोकमान्य टिळक यांची १०३ वी पुण्यतिथी व डॉ अण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती दिल्लीत साजरी

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

लोकमान्य टिळक यांची १०३वी पुण्यतिथी व डॉ अण्णाभाऊ साठे यांची १०३वी जयंती नवी दिल्ली येथील जुने महाराष्ट्र सदन येथे सह्याद्री उद्योग शिलता संस्थेच्या वतीने साजरी करण्यात आली. या जयंतीचे प्रमुख पाहुणे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, डॉ शांतविर्लिंग शिवाचार्य महाराज हिरेमठ संस्थान भाजपचे सचिव सुनील देवधर होते.

लोकमान्य टिळक, डॉ अण्णाभाऊ साठे यांना पुष्पांजली अर्पित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. आयोजन समितीचे अध्यक्ष विनोद जाधव यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. आणी संस्थेचे अध्यक्ष अरुण देहरकर, ट्रस्टी कमलेश गायकवाड सचिव रेवणकर यांनी ही मान्यवरांचे स्वागत केले. या कार्यक्रमात भडगाव तालुक्यातील भगवान सुकदेव शिंदे व प्रकाश कोतकर यांना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते समाज भूषण पुरस्कार देण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन एल.के.सूर्यवंशी यांनी केले. ॲड अग्रवाल, ॲड पवार, प्रा.मधुकर सोनवणे निलंगा, इरम जैदी, इलिया जाफर, प्रकाश कांबळे, यांच्यासोबत बरेच मान्यवर उपस्थित होते. लातूरचे खासदार सुधाकर श्रुंगारे यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम घेण्यात आला. खासदार सुधाकर श्रुंगारे यांनी संस्थेने आभार वेक्त केले. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अरुण देहरकर यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.