चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
चाळीसगाव शहरातील घाटरोडवरील छाजेड ऑईल मीलजवळील सुभाष कॉम्पले्सच्या भिंतीच्या आडोश्याला सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर चाळीसगाव शहर पोलीसांनी छापा टाकून 9 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व रोकड असा सुमारे 7 हजार 400 रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी 9 जणांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेली माहितीनुसार, पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना शहरात छाजेड ऑईल मिलजवळ सुभाष कॉम्पलेक्सच्या भिंतीच्या आडोशास काही लोक झन्ना मन्ना नावाचा पत्ता जुगाराचे खेळावर पैसे लावुन जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली असता त्यांनी पोलीस पथकाला कारवाईचे निर्देश दिले. उपनिरीक्षक सुहास आव्हाड, योगेश माळी, पोना.तुकाराम चव्हाण, पोकॉ.विनोद खैरनार, ज्ञानेश्वर पाटोळे, आशुतोष सोनवणे, नंदकिशोर महाजन, मोहन सुर्यवंशी यांनी मंगळवारी रात्री पावणे दोन वाजेच्या सुमारास जुगार खेळतांना विशाल बाबुराव मगरे, शेख शरीफ शेख मुसा, किरण भास्कर गायकवाड, अमोल सिताराम कोळी, उमेश खंडु पवार, राजु रघुनाथ भोई, गणेश शिवराम आगोणे, हरीष राजेंद्र भोई, सचिन भास्कर सोनवणे सर्व रा. चाळीसगाव हे मिळून आले. त्यांच्या ताब्यातून पोलीसांनी 52 पत्यांचा कॅट व 7 हजार 400 रूपयांची रोकड जप्त केली आहे. याप्रकरणी ज्ञानेश्वर पाटोळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 9 जणांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या चाळीसगाव शहरात जुगार अड्ड्यावर अवैध सावकारीचा ऊत आला असून तरूण कर्जबाजारी व व्यसनाधीन होत आहेत. पोलीसांकडून जुगारींवर गुन्हा दाखल केला जातो. परंतु जुगार अड्डा मालक पळण्यात कसे काय यशस्वी होतात ? असा सवाल सर्व सामान्य जनतेमध्ये निर्माण होतो.