वाढत्या प्रदूषणामुळे जळगाव मनपाचा महिन्याचा पाहिला बुधवार असेल “नो व्हेईकल डे”…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

जळगांव शहराचे वाढते प्रदूषण लक्षात घेता जळगांव शहर महानगरपालिकेने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी नो व्हेईकल डे साजरा करण्याचे योजिले आहे. त्या अनुषंगाने दि.०६/१२/२०२३ रोजी महानगरपालिकेतील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी सायकल, ई-व्हेईकल किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टने कार्यालयात यावे जेणे करुन प्रदुषण कमी करण्यास मदत होईल.

या कार्यक्रमास प्रोत्साहन मिळावे म्हणून आयुक्त डॉ. विद्या गायकवाड या कार्यालयात पायी चालत आल्या तसेच अविनाश गांगोडे, उपायुक्त सा.प्र., निर्मला गायकवाड-पेखळे, उपायुक्त महसुल, अश्विनी गायकवाड-भोसले, सहाय्यक आयुक्त, सा.बा, हे ई-व्हेईकलने तर चंद्रकांत वानखेडे, मुख्यलेखाधिकारी. मारोती मुळे, मुख्यलेखा परिक्षक, तसेच अभिजित बाविस्कर, सहाय्यक आयुक्त हे कार्यालयात पायी आले. तसेच उदय पाटील प्र. सहाय्यक आयुक्त (आरोग्य विभाग) हे सायकल वर आले तर महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाने ई-व्हेईकल व पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करुन या नो व्हेईकल डे चे तंतोतंत पालन केले.

सदरचा कार्यक्रम महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागा मार्फ़त घेण्यात आला यावेळी सायकल, ई-व्हेईकल किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टने आलेल्या वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रकाश पाटील, पर्यावरण अधिकारी, अनिल करोसिया व सुयश सोनटक्के यांनी पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले. महानगरपालिकेने राबविलेला नो व्हेईकल डे हा कार्यक्रम १०० टक्के यशस्वी झाला. तसेच इतर शासकीय व खाजगी कार्यालयांनी ह्या कार्यक्रमात सहभागी होऊन या राष्ट्रीय कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवावा असे जळगाव मनपाचे आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी आवाहन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.