हॉटेल, रेस्टॉरंट, मिठाईची दुकाने, चिकन शॉप यांना स्वच्छता मानांकनासाठी अर्ज करण्याचे आवाहन

0

जळगाव,;- नवी दिल्लीच्या अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणा मार्फत हॉटेल, रेस्टॉरंट, कॅन्टिन, मिठाईची दुकाने, बेकरी, चिकन/मटन शॉपकरिता स्वच्छता मानांकन (Hygiene Rating) ही ऐच्छिक योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या आस्थापनांनी १३ डिसेंबर २०२३ पर्यंत वरील पत्त्यावर अर्ज करावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त सं.कृ.कांबळे यांनी केले आहे.

स्वच्छता मानांकन (Hygiene Rating) हे स्वमूल्यांकन व त्रयस्थ पक्षाच्या ऑडिटद्वारे प्रमाणित करण्यात येते. या योजनेंतर्गत अन्न व व्यावसायिकांना आस्थापनेमध्ये अन्न सुरक्षा विषयक करण्यात येत असलेल्या उपाययोजना व त्याचे पालन याबाबत ग्राहकांचा विश्वास प्राप्त करण्याची संधी मिळते. त्यामुळे ग्राहकांना उच्च मानांकित (Hygiene Rating) प्रमाणपत्र प्राप्त आस्थापनेमध्ये अन्न सुरक्षा विषयक नियमांचे पालन होत असल्याचे हमी मिळते. हे प्रमाणपत्र अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली मार्फत देण्यात येते.

जळगाव जिल्ह्यातील जास्तीत जास्त शासकीय, निमशासकीय व खाजगी हॉटेल, रेस्टॉरंट, कॅन्टिन, मिठाईचे दुकाने, बेकरी, चिकन/ मटन शॉप इत्यादी अन्न आस्थापनांनी (Hygiene Rating) या योजनेमध्ये सहभाग घ्यावा. (Hygiene Rating) योजनेच्या अधिक माहितीसाठी https://hygiene.fssai.gov.in संकेतस्थळावर भेट द्यावी. जिल्ह्यात १२५ आस्थापनांचे स्वच्छता मानांकन (Hygiene Rating) करण्यात येणार आहे. तरी पात्र अन्न आस्थापनांनी जिल्हा कार्यक्षेत्रातील सहायक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन, पहिला मजला, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्केट, जळगाव -४२५००१ या पत्त्यावर अर्ज करावेत.

पात्र संस्थांना प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर स्वच्छता मानांकन (Hygiene Rating) करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.