भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क
तुम्ही रेल्वेने जाण्याच्या विचारात असाल ही बातमी नक्की वाचा. नॉन इंटरलॉकिंगचे काम सुरु असल्याने भुसावळ विभागातून धावणाऱ्या काही गाड्याचे मार्ग बदल करण्यात आला आहे.
विजयवाडा विभागातील वारंगल – काझीपेठ स्थानक आणि विजयवाडा – गुडूर स्थानकादरम्यान तिसऱ्या लाइनच्या कामासाठी नॉन इंटरलॉकिंगचे काम केले जात आहे. या कामादरम्यान भुसावळ विभागातून धावणाऱ्या या गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.
1) गाडी क्रमांक 20804 गांधीधाम – विशाखापट्टणम साप्ताहिक एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक 10.12.2023 आणि 17.12.2023 रोजी नागपूर – रायपूर – टिटलागड – रायगडा – विजयनगरम मार्गे विशाखापट्टणमला जाईल.
2) गाडी क्रमांक 20820 ओखा-पुरी साप्ताहिक एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक 06.12.2023 आणि 13.12.2023 रोजी नागपूर-रायपूर-टिटलागड-रायगडा-विजियानगरम मार्गे पुरी स्टेशन जाईल.
3) गाडी क्रमांक – 20803 विशाखापट्टणम – गांधीधाम साप्ताहिक एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक 07.12.2023 आणि 17.12.2023 रोजी विजयनगरम – रायगडा – टिटलागड – रायपूर – नागपूर मार्ग गांधीधाम जाईल.
4) गाडी क्रमांक 20819 पुरी – ओखा साप्ताहिक एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक 10.12.2023 आणि 17.12.2023 रोजी विजयनगरम – रायगडा – टिटलागड – रायपूर – नागपूर मार्ग ओखा जाईल.
ब्लॉकमुळॆ केलेला हा बदल प्रवाशांनी नोंद घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.