सावधान; तुम्ही नकली दारू पिताय… मुक्ताईनगरात बनावट दारूचा कारखाना…

0

 

मुक्ताईनगर, लोकशाही न्युज नेटवर्क:

तालुक्यातील रुईखेडा येथील एका पोल्ट्री फार्ममध्ये सुरू असलेल्या बनावट दारूचा कारखाना राज्य उत्पादन शुल्क (State Excise Department) खात्याच्या पथकाने उध्वस्त करत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मुक्ताईनगर तालुक्यात बनावट दारूचे रॅकेट असल्याची चर्चा अनेकदा होत असते, रुईखेडा येथील एका पोल्ट्री फार्म मध्ये बनावट दारू तयार केली जात असल्याची माहिती स्टेट एक्साइजच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या अनुषंगाने पथक तयार करून काल मध्यरात्री च्या सुमारास छापा टाकण्यात आला.

या छाप्या दरम्यान सदरच्या ठिकाणी देशी-विदेशी दारू बनावट पद्धतीने तयार करण्यात येत असल्याचे दिसून आले. बनावट दारू तयार करून त्या बॉटलमध्ये पॅक करून यावर विविध कंपन्यांचे लेबल लावून विकले जात असल्याचे दिसून आले. या कारवाईत बनावट दारू तयार करण्याचे रसायन आणि सामग्री असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क खात्याचे भुसावळ येथील निरीक्षक सुजित कपाटे यांनी बोलतांना या कारवाईला दुजोरा दिला आहे. यासंदर्भात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू आहे, दरम्यान या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here