रासेयो शिबिरात मोफत रक्त तपासणी आरोग्य तपासणी व दंतचिकित्सा

0

लोकशाही न्युज नेटवर्क 

फैजपूर;  दि.27/03/२०२२ कळमोदा, दि.26/3/22 रोजी धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर,राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिरामध्ये मोफत रक्त तपासणी आरोग्य तपासणी व दंतचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी 50 पेक्षा अधिक कळमोदा गावकऱ्यांनी आपल्या आरोग्याचीमोफत चिकित्सा करून घेतली.

या शिबिरात डॉक्टर उमेश चौधरी, डॉक्टर गणेश भारंबे, डॉक्टर नितिन पाटील, डॉक्टर प्रेमचंद तिडके, डॉक्टर भावेश जावळे ग्रामीण रुग्णालय न्हावी येथील समुपदेशक श्री मनोज चव्हाण या सेवाभावी डॉक्टरांनी  शिबिरात कळमोदा गावकऱ्यांचे आरोग्य तपासणी केली.

शिबीर यशस्वीतेसाठी कार्यक्रमाधिकारी डॉ. दीपक सूर्यवंशी,सहा. कार्यक्रमाधिकारी डॉ. सरला तडवी,सहा. कार्यक्रमाधिकारी प्रा.शेरसिंग पाडवीयांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाला प्रा.  प्राजक्ता काचकुटे, प्रा. दीपक पाटील, प्रा.संदीप भालेराव हे आवर्जून उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.