चालत्या ट्रकमधून ३ लाखांचा मुद्देमाल चोरी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव ;शहरातील सुरत येथून नागपूर येथे हा माल ते  घेवून जात होते .नवापूर ते जळगाव दरम्यान धावत्या तीन लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार नशरिाबाद टोल नाक्याजवळ उघडकीला. नशिराबाद पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आलाय

जळगाव शहरातील शिवकॉलनी येथील किरण अनिल घाटे यांनी सुरत येथून त्यांच्या वाहनांमध्ये वेगवेगळ्या दुकानदार तसेच कंपन्यांचा माल भरला. सुरत येथून नागपूर येथे हा माल ते  घेवून जात होते. नवापूर ते जळगावदरम्यान चोरट्यांनी ट्रकमधून विविध कंपनीचे असलेले एकूण ९ पार्सल असा एकूण २ लाख ९५ हजार २८३ रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. जळगाव तालुक्यातील नशीराबाद टोलनाक्यावर ट्रकमधून मुद्देमाल चोरुन नेल्याचा प्रकार किरण घाटे यांच्या लक्षात आला.

याप्रकरणी घाटे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शनिवार २६ मार्च रोजी नशीराबदाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र ठाकरे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.