“अबे हरामखोराची औलाद”; सत्ताधारीचं आमने-सामने…

0

 

अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क;

राज्यात सत्ता परिवर्तन झाले मात्र मंत्रिमंडळात स्थान ण मिळाल्याने अनेक आमदार नाराज आहेत. त्यात आमदार बच्चू कडू यांचे नाव आघाडीवर आहे. पुढील विस्तारत स्थान मिळेल या आशेवर त्यांच्यासह अनेक बंडखोर आमदारांसहित अमरावतीचे भाजप समर्थक अपक्ष आमदार रवी राणा देखील आहेत. परंतु अमरावतीत रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर केलेल्या टिके नंतर जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलं तापलं असून बच्चू कडू यांनीही आक्रमकपणे राणा यांच्यावर पलटवार केला आहे.

मी गुहावाटीला जाणारा आमदार नाही. ना बाप बडा ना भैया, सबसे बडा रुपय्या. असं म्हणत रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर टीका केली होती.

या टिकेला उत्तर देतांना बच्चू कडू यांची जीभ मात्र घसरली, ते म्हणाले…  ‘ अबे हरामखोराची औलाद… आम्ही जर गुहावाटीला गेलो नसतो तर तू मंत्रिपदाच्या शर्यतीत नसता. आमच्यामुळेच तू आता मंत्रिपदाच्या शर्यतीत रांग लावून आहे. आम्ही बायकोला नाचवणाऱ्यापैकी नाहीत, असं म्हणत बच्चू कडू यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावरही नाव न घेता टीका केली आहे.

दरम्यान अपक्ष आमदार असलेल्या बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा दिला आहे तर रवी राणा यांनी भाजपाला पाठिंबा दिलेला आहे. सत्ताधारी पक्षांना पाठिंबा असलेलेच दोन्ही आमदार एकमेकांसमोर उभे ठाकल्याने भाजप व शिंदे गट युतीतही संघर्ष निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.