कजगाव उरूस निमित्त कुस्त्यांची विराट दंगल…

0

 

कजगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

तितुर नदीच्याकाठी सालाबादाप्रमाणे दरवर्षी कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन लोक सहभागातून केले जाते. यावेळी भडगाव, पाचोरा, चाळीसगाव तसेच अनेक तालुक्यातील मल्ल यामध्ये सहभाग घेतात. मल्लांनी आपल्या चित्तथरारक डाव पेज वापरून कुस्त्यांमध्ये रंगत आणून प्रेक्षकांची मने जिंकली.

दरम्यान यावेळी आखाडा पूजन जि.प.चे माजी शिक्षण सभापती एकनाथ महाजन, दिनेश पाटील, जय बजरंग व्यामशाळेचे अध्यक्ष पोपट महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी सरपंच निवृत्ती पवार, मंगलसिंग पाटील, बाळासाहेब राजपूत, हिलाल चौधरी, दिनकरराव पाटील, गोटू वस्ताद, किशोर महाजन, पोपट सोनवणे, नाना पहेलवान, सुनील पाटील, योगेश पाटील, शिवा पहेलवान, अर्जुन मालचे, पंढरीनाथ बोरसे, अण्णा पहेलवान, संभाजी पवार, वाल्मिक बोरसे, दादा पाटील, बिहारी कोळगावकर आदी. उपस्थित होते. यावेळी विविध ठिकाणची नावाजलेले मल्ल व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.