एरंडोल महामार्गावर भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव जिल्ह्यासातील अपघातांची मालिका सुरूच आहे. एरंडोल महामार्गावर असाच एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकचा अंदाज न आल्याने भरधाव वेगाने येणारी दुचाकी ट्रॅकवर जोरात आदळली. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. तर सोबत असलेला सहकारी गंभीर जखमी झाल्याचे समोर येत आहे. हा अपघात रविवारी झाल्याचे समोर येत आहे.

सूत्रांनुसार, महामार्ग क्र. ६ वर एरंडोल जवळ हा अपघात झाला असून, यात जालना जिल्ह्यातील योगेश निवृत्ती वानखेडे व असलेला त्यांचा मित्र भगवान पांडुरंग सोनवणे हे दोघंही पारोळ्याकडून जळगावला येत असतांना रात्री दहाच्या सुमारास एरंडोल येथे रस्त्यावर चुकीच्या दिशेने ट्रक उभा होता. रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकचा अंदाज न आल्याने भरधाव दुचाकीने ट्रकच्या मागील बाजूने जोरदार धडक दिली असता दुचाकीवरील दोन्ही तरुण रस्त्यावर फेकले गेले. यात दुचाकीचालक योगेश वानखेडे यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचे सहकारी भगवान सोनवणे हे जखमी झाले. अपघाताचा आवाज येताच आजूबाजूचे नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू करून जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली. ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांना तपासले असता योगेश वानखेडे मृत घोषित केले. ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी अपघातात गंभीर झालेल्या तरुणाकडून माहिती घेऊन मृताच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांना अपघाताची माहिती दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.