एरंडोल येथे छातीत आसारी घुसून बारा वर्षीय मुलाचा हृदयद्रावक मृत्यू…

0

 

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

एरंडोल येथे जुन्या धरणगाव रस्त्यालगत नगरपालिकेतर्फे मोठ्या गटारीचे बांधकाम सुरू आहे. दरम्यान सोमवारी संध्याकाळी सात ते साडेसात वाजेच्या सुमारास गटारीच्या बांधकामालगत खेळत असताना विशाल रवींद्र भिल (१२) या मुलाच्या छातीत आसारी घुसल्याने त्याचा करूण अंत झाला. याप्रकरणी पोलीस स्टेशनला नोंद करण्याचे काम सुरू होते.

एरंडोल येथे जुन्या धरणगाव रस्त्यालगत एका बाजूला भिल्ल वस्ती असून, रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला नगरपालिकेतर्फे एरंडोल पोस्ट ऑफिस पासून ते एरंडोल धरणगाव रस्त्यापर्यंत मोठ्या गटारीचे बांधकाम सुरू आहे. विशाल रवींद्र भिल हा मुलगा खेळत असताना गटारीच्या बांधकामाची उघडी असलेली असारी ही विशालच्या छातीत घुसली व तो जागीच गतप्राण झाला. ही घटना घडतात त्याच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला.

रवींद्र भिल हे मोलमजुरी करून प्रपंच सांभाळात पोटाची खळगी भारतात. आधीच अठरा विश्व दारिद्र्य त्यात या संकटाची भर पडली आहे. गटारीचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे नाहक निष्पाप मुलाचा बळी गेला, त्यामुळे भिल्ल समाज बांधवांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.