खळबळजनक : एरंडोल तालुक्यातील मुलींच्या वसतिगृहात पाच मुलींचे लैंगिक शोषण! ; तिघांविरुद्ध गुन्हा

0

एरंडोल ;--तालुक्यातील एका शासकीय मुलींच्या वसतिगृहामध्ये पाच मुलींचे लैंगिक शोषण करण्यात येत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. हा प्रकार वसतिगृहाच्या काळजीवाहकानेच केल्याचे धक्कादायक माहिती समोर आली असून त्याला याप्रकरणी साथ देणाऱ्या त्याची पत्नी आणि सचिव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे दरम्यान पीडित मुलींची जळगावच्या रिमांड होम मध्ये रवानगी करण्यात आली आहे.

गणेश शिवाजी पंडित असे या नराधम काळजीवाहकाचे नाव आहे. . हे प्रकरण वस्तीगृहातील त्याची अधीक्षिका पत्नी व सचिवाला माहित झाले. मात्र त्यांनीही या प्रकाराकडे दुर्लक्ष केले आहे.

सदर पाचही मुलींवर ऑगस्ट २०२२ ते जून २०२३ या दरम्यान एरंडोल तालुक्यातील एका गावातील मुलींचे वसतीगृहात लैंगिक अत्याचार झाले आहेत. पाच बालिका तेथील वसतीगृहात अभिरक्षेत असतांना सदर वसतीगृहातील काळजी वाहक गणेश शिवाजी पंडीत याने पाचही बालिकांशी उपरोक्त काळात वेळोवेळी लैंगीक छळवणूक करुन अनसर्गिक संभोग देखील केलेला आहे. तसेच सदरची माहीती नमुद बालिकांनी संस्थेच्या अधिक्षक व काळजीवाहक गणेश पंडित याची पत्नी अरुणा गणेश पंडित आणि सचिव भिवाजी दीपचंद पाटील (रा. तळई ता. एरंडोल) यांना दिली.

घटनेचे गांभीर्य पाहता त्यांनी त्यांचे कर्तव्य न करता नराधम गणेश पंडित याला मदत करीत सदरची माहीती लपवुन ठेवली. या प्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनचे पीएसआय शरद बागल यांच्या फिर्यादीवरून गणेश शिवाजी पंडीत, सचिव भिवाजी दीपचंद पाटील यांच्यासह अधीक्षक महिला अरुणा पंडित यांची विरुद्ध भा.द.वि.क. ३५४, ३७६ (२) (ड) (एन) (क), ३७७, POCSO कलम ३,४,५, ६,८,९,१०,१२, १९, २१, सह अनुसुचीत जाती व जमाती कायदा कलम ३ (१) (अ) (ई) (व्ही) (डब्ल्यू) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास डीवायएसपी सुनील नंदवाळकर करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.