कंपनीच्या गोदामातून वायर बंडल चोरणाऱ्याला अटक

0

जळगाव:-एमआयडीसी भागातील एका कंपनीमधून मजूर कामगाराने सव्वा लाख रुपयांचे लोखंडी वायरचे तीन बंडल चोरून नेल्याप्रकरणी एकाला एमआयडीसी पोलिसांनी मुद्देमालासह अटक केले आहे .याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,

गोेदामाच्या भिंतीची खिडकी तोडून  चेतन प्रेसीजन टूल्स कंपनीच्या गोदामातून अज्ञाताने सव्वा लाखांचे लोखंडी वायरचे तीन बंडल लांबवले होते. याप्रकरणी कंपनीचे एच.आर.मॅनेजर योगेश भगवान सोनार (34, प्लॉट नं.32, कमल पार्क, सिध्दीविनायक शाळेजवळ, अयोध्या नगर, जळगाव) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या कंपनीच्या कामगाराने हा मुद्देमाल चोरला असल्याचे माहिती मिळाल्यानुसार सुभाष पंडित पाटील (39 विठ्ठल मंदीराजवळ, सुप्रीम कॉलनी, जळगाव) याला एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले. संशयिताला न्यायलयात हजर केल्यानंतर त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

ही कारवाई एमआयडीसी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय अतुल वंजारी, पोलीस नाईक इम्रान सैय्यद, सचिन पाटील, मुदस्सर काझी, राहुल रगडे, विशाल कोळी, साईनाथ मुंढे, निलोफर सैय्यद, पोलीस चालक इम्तीयाज खान आदींच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.