सोशल मीडियावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची बदनामी केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा

0

जळगाव : सोशल मीडियावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची  बदनामी केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

नगरसेवक गणेश सोनवणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शिवसेना जळगाव ग्रामीण या फेसबुक पेजवर 7 एप्रिल ते 25 जुलैपर्यंत वेळोवेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याबाबत बदनामीकारक मजकूर टाकण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात भादंवि कलम 499 व 500 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रेय पोटे हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.