Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • सीजीपीच्या तिरंगा यात्रेने लक्ष वेधले!
    • अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»मुलीच्या ऍडमिशनवरून वाद ; पत्नीने पतीला पेटवून दिले
    गुन्हे वार्ता

    मुलीच्या ऍडमिशनवरून वाद ; पत्नीने पतीला पेटवून दिले

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 26, 2023Updated:July 26, 2023No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे;-पाच वर्षाच्या मुलीच्या शाळेतील ॲडमिशनच्या कारणावरून वाद विकोपाला जाऊन पत्नीने चक्क पतीच्या अंगावर रॉकेल ओतून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना येरवडा येथे घडली असून या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे या घटनेत पती 50 टक्के भाजला गेला असून शेजाऱ्यांनी त्याला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे याप्रकरणी पोलिसांनी पत्नीला ताब्यात घेतले आहे .

     

    मंगळवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.मुकेश सुरेश राजपूत (वय 42, रा. येरवडा) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी पत्नी उज्वला दत्तात्रय कांबळे (वय 44) हिला अटक केली आहे. तर, तिच्या एका 55 वर्षीय नातेवाईकाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

    उज्वला ही जखमी मुकेश यांची दुसरी पत्नी आहे. या दोघांना पाच वर्षाची मुलगी आहे. या मुलीचा शाळेत प्रवेश घेण्यावरून आणि शाळेतील प्रवेश शुल्कावरून दोघांमध्ये मागील काही दिवसांपासून वाद होते. याच वादातून पत्नी उज्वलाने घरातून रॉकेलचा डब्बा आणला आणि पतीच्या अंगावर ओतला. त्यानंतर लायटरने त्यांना पेटवून दिले.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #crime Yrvada पुणे
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!

    October 16, 2026

    एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!

    October 15, 2026

    मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!

    October 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif