राज्यातील १० राजकीय पक्षांच्या मान्यता रद्द

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राज्यात सध्या रोज नवनवीन राजकीय (Maharashtra Politics) घडामोडी घडत आहेत. शिवसेनेतून (Shivsena) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काही आमदारांना सोबत घेऊन बंड पुकारले. यामुळे राज्यात मोठा सत्तासंघर्ष निर्माण होवून भाजपचा (BJP) पाठींबा मिळवत एकनाथ शिंदे यांनी सत्ता स्थापन केली. त्यांनतर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर आपला दावा करत उद्धव ठाकरे गट (Uddhav Thackeray group) आणि शिंदे गट (Shinde Group) यांच्यात चढाओढ सुरु असून आता नेमका शिवसेना पक्ष कोणाचा ? हे प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात (Supreme Court) गेले आहे.  त्यातच केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission Of India) देशातील एकूण १११ राजकीय पक्षांची (Political Party) मान्यता रद्द केली आहे. यात महाराष्ट्रातील (Maharashtra) १० पक्षांचा समावेश आहे.

राज्य आणि पक्ष (State and political parties)

दिल्ली ३३, उत्तर प्रदेश १०, आसाम ९, जम्मू काश्मीर ८, बिहार ६, आंध्र प्रदेश ५, ओरिसा ३, गुजरात ३, केरळ ३, तामिळनाडू ३, मध्य प्रदेश ३, पश्चिम बंगाल २, मिझोराम २, कर्नाटक २, हरयाणा २, पंजाब १, हिमाचल प्रदेश १, राजस्थान १, झारखंड १, मेघालय १, उतराखंड १

महाराष्ट्रातील १० पक्ष

भारतीय आवाज पार्टी – मुंबई

वॉर वेतरणा पार्टी – मुंबई

जनादेश पक्ष – मुंबई

न्युज काँग्रेस – मुंबई

पीपल्स पॉवर पार्टी – मुंबई

राष्ट्रीय लोक जागृती पार्टी – ठाणे

शेतकरी विचार दल – अहमदनगर

भारतीय राष्ट्रीय स्वदेशी काँग्रेस पक्ष – पुणे

विदर्भ विकास पार्टी – नागपूर

विदर्भ राज्य पार्टी – नागपूर

 

Leave A Reply

Your email address will not be published.