मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री गुजरातला रवाना, होणार महत्त्वाची बैठक

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सध्या राज्यातील राजकीय वर्तुळात नवनवीन घडामोडी घडत असतात. त्यातच एक मोठी बातमी समोर आलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुजरातला रवाना झाले असून त्यांच्या पाठोपाठ आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील गुजरातला रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचे म्हटले जात होते. मात्र त्या मागचे नक्की कारण काय हे समजू शकले नव्हते.

दरम्यान आता याबाबतची  मोठी माहिती समोर आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली गुजरातच्या गांधीनगर येथे क्षेत्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीमध्ये शारीरिक शोषण आणि अत्याचार या प्रकरणाच्या तात्काळ चौकशी बाबत चर्चा होणार आहे. याचबरोबर पायाभूत सुविधा आणि पर्यावरण संदर्भात विषयांवर चर्चा होणार आहे. याचबरोबर शेजारी राज्यात परस्पर सहयोग निर्माण करण्याविषयी चर्चा होणार आहे. या बैठकीमध्ये महाराष्ट्रा सह इतर राज्याचे प्रतिनिधी देखील उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत अनेक प्रश्नांवर चर्चा होऊन ते मार्गी लागतील असे म्हटले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.