ईलेक्ट्रीक वजनकाट्याचा शॉक लागून विवाहितेचा मृत्यू

0

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

इलेक्ट्रॉनिक वजनकाट्याचा शॉक लागल्याने धरणगाव तालुक्यातील गंगापूरी येथील विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी २७ ऑगस्ट रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली. भारती घनश्याम पाटील (वय ३०, रा. गंगापूरी ता. धरणगाव) असे मृत विवाहितेचे नाव आहे.

धरणगाव तालुक्यातील गंगापूर येथील घनश्याम रायभान पाटील हे पत्नी भारती पाटील आणि दोन मुलांसह सुरत येथे वास्तव्याला आहे. कानुबाईचा उत्सव असल्याने घनश्याम पाटील हे पत्नी व दोन्ही मुलांसह गंगापूर येथे आलेले होते. रविवारी २७ ऑगस्ट रोजी घनशाम पाटील हे आईवडीलांसह सकाळी शेतात भेंडी तोडण्यासाठी गेले होते. त्यावेळी विवाहिता भारती व दोन्ही मुलं घरीच होते.

दरम्यान सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास भारती यांची दोन्ही मुले रडत आरडाओरड करत आमची आई बेशुध्द पडली असल्याचे त्यांनी शेजारच्यांना  सांगितले. यावेळी  शेजारी राहणाऱ्या महिला व ग्रामस्थांनी धाव घेतली असता त्यांचा हातात वजनकाट्याची ईलेक्ट्रीक पीन हातात दिसली.  गावकऱ्यांनी मिळून भारती पाटील यांना धरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषीत केले. या प्रकरणी धरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ ईश्वर शिंदे हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.