मेट्रोचं कारशेड आरेमध्येच होणार

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर आरेतील मेट्रो कारशेड प्रकल्प रद्द करण्यात आला आणि कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला गेला होता. पण आता मात्र आरेतील मेट्रोच्या कारशेडवरील स्थगिती मुख्यमंत्र्यांकडून मागे घेण्यात आली असून कारशेडचा मार्ग मोकळा करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार दणका दिलाय. मेट्रो – 3 चं कारशेड आरेमध्येच होणार आहे. मेट्रो – 3 हा देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी निर्णय आहे. आता शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने पुन्हा एकदा मेट्रो कारशेड प्रकल्प आरेमध्येच पुर्णत्वास नेण्याचा निर्णय घेतलाय.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की मुंबईकरांच्या हितासाठी लवकरात लवकर मेट्रो सुरु करायची असेल तर कारशेड आरेतच बनलं पाहिजे. त्यासाठी आमचा आरेतच कारशेड बनवण्याचा निर्णय असेल. आरेतील ज्या जागेस सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली होती तिथे 25 टक्के काम पूर्ण झालं आहे आणि राहिलेलं 75 टक्के काम लवकर केलं जाऊ शकतं. उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा आहे हे मी त्यांना वारंवार सांगितलं होतं. त्यांना विनंती केली होती की तुमचा ईगो तुम्ही बाजूला ठेवा आणि कारशेड आरेतच होऊ द्या, असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.