अनिल नावंदर यांचा यथोचित गौरव

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशनचे मानद सचिव खामगावचे रहिवासी अनिल नावंदर यांचा खामगाव पत्रकार संघातर्फे ‘खामगाव रत्न’ पुरस्कार देऊन 6 जानेवारीला पत्रकार दिनी सत्कार केला जाणार आहे. तसेच शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्याच्या करणाऱ्या विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाला गो.से. महाविद्यालयाला खामगाव गौरव हा पुरस्कार जाहीर झाला आहे. जळगाव पत्रकार संघाने पत्रकार दिनी बिगर पत्रकाराला पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. कारण पत्रकार संघातर्फे पत्रकारांनाच गौरव दिला जातो, ही परंपरा आहे. ती परंपरा मोडून काढत समाजात चांगले कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांची निवड केल्याबद्दल खामगाव पत्रकार परिषद संघाच्या हा निर्णय स्तुत्य म्हटला पाहिजे. कारण पत्रकार हा समाजातील चांगल्या वाईट घटनांचा मागोवा घेत असतो. म्हणून पत्रकार संघटनेने पत्रकाराचा सत्कार करण्याऐवजी सामाजिक कार्यात हिरीरीने भाग घेऊन समाज कार्य करणाऱ्यांचा गौरव सुद्धा करणे महत्त्वाचे आहे. राज्य केमिस्ट असोसिएशनचे मानद सचिव अनिल नावंदर यांना खामगाव रत्न पुरस्कार देऊन पत्रकार संघातर्फे गौरवणार गौरवण्यात येणार असल्याने पत्रकार संघटनेची प्रतिमा उजळ झालेली आहे. अनिल नावंदर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या वैद्यकीय सेवेला छोट्या प्रमाणातून सुरुवात करून या व्यवसायात आज जी भरारी मारली आहे त्याचा आदर्श वैद्यकीय क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या सर्वांनीच घेण्यासारखा आहे. आपला व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढवून त्यातून वारेमाप कमाई तर अनेक जण करीत असतात, परंतु वैद्यकीय औषधी विक्रीचा व्यवसाय अत्यंत सचोटीने करून त्यात मानाचे स्थान पटकावणे महत्त्वाचे असते. अनिल नावंदर यांनी अत्यंत सचोटीने प्रयत्न केला आहे आणि करीत आहेत..

व्यवसायातून पैसे तर सर्वच जण कमवतात परंतु आपल्या व्यवसायाचा काही हिस्सा सर्वसामान्य गोरगरीब वंचितांना कसा देता येईल हे अनिल नावंदर यांचे कडून शिकण्यासारखे आहे. औषधी मुळे रुग्णांचे प्राण वाचतात. त्यासाठी गोरगरिबांसाठी विविध ठिकाणी खामगाव परिसरात रोगनिदान शिबिर आयोजित करून तेथे स्वतः मार्फत तसेच केमिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून मोफत औषधी देण्याचा उपक्रम ते राबवतात. तसेच अनेक गरजूंना स्वतः तसेच संघटनेच्या आर्थिक मदती देऊन त्यांच्या पायावर उभे करण्याचे उपक्रम देखील ते राबवतात. गोरगरिबांना मोफत अन्नदान करून गरीबाचे चेहऱ्यावर हास्य फुलवितात. एका व्यावसायिक व्यक्तीकडून हे होत असताना त्यांच्या समाजकार्याची दखल खामगाव पत्रकार संघाने घेतली, त्याबद्दल त्या संघाचे अभिनंदन केले पाहिजे. पत्रकारांतर्फे अन्यायाला वाचा फोडून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातो. हे पत्रकारांचे जसे प्रमुख कर्तव्य आहे, त्याचप्रमाणे समाजासाठी चांगले कार्य करणाऱ्यांची दखल घेऊन त्यांना प्रकाशात आणून त्यांचा गौरव करणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. ते काम खामगाव पत्रकार संघातर्फे करण्यात आले आहे. अनिल नावंदर हे राज्य केमिस्ट असोसिएशनचे सध्या मानस सचिव आहेत. संघटनेत त्यांनी विविध पदे उपभोगली आहेत. संघटनेच्या बांधणी त्यांचा मोलाचा वाटा आहे. खामगावला झालेल्या त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी दैनिक लोकशाहीच्यावतीने आम्ही उपस्थित होतो. खामगाव परिसरातच नव्हे तर बुलढाणा जिल्हा आणि विदर्भातील व्यावसायिकांमध्ये देखील त्यांची फार मोठी लोकप्रियता आहे. अनेक छोट्या छोट्या वैद्यकीय औषधींचा व्यवसाय करणाऱ्यांच्या अडीअडचणीला समजून घेऊन त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी हातभार लावण्यात अनिल नावंदर अग्रेसर आहेत. संघटनेच्या माध्यमातून औषध विक्री करणाऱ्यांवर व्यावसायिकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न स्तुत्य म्हणता येईल. वैद्यकीय क्षेत्रात छोट्या व्यावसायिकांचे ते तारणहार आहेत, असे वक्तव्य केले जाते. अनिल नावंदर यांना खामगाव रत्न पुरस्कार जाहीर करून खामगाव पत्रकार संघाने एका चांगल्या व्यक्तीची निवड केली आहे. खामगाव रत्न पुरस्कारांमुळे त्यांच्या समाजकार्याला आणखी झळाळी येणार आहे. या पुरस्काराबद्दल अनिल नावंदर यांचे दैनिक लोकशाहीच्यावतीने अभिनंदन आणि त्यांच्या भविष्यातील कार्याला शुभेच्छा…!

Leave A Reply

Your email address will not be published.