कै.कृष्णाराव पाटील कोठावळे पुरस्कार पत्रकार अरुण पाटील यांना जाहिर…

0

 

मनवेल, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

श्री कालिका देवी मंदिर संस्थान नाशिक आयोजित कै. कृष्णाराव पाटील कोठावळे (नाशिकचे मुलकी व पोलीस पाटील ) उत्तर महाराष्ट्र पत्रकार सत्कार सोहळा पत्रकार दिनानिमित्त शुक्रवार दि. 5 जानेवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजता श्री कालिका मंदिर सभागृह नाशिक येथे ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा, अण्णासाहेब पाटील (अध्यक्ष श्री कालिका देवी मंदिर संस्थान नाशिक), रवींद्र नाईक (उपसंचालक क्रीडा व युवक सेवा संचनालय नाशिक विभाग), सुभाष तळाजिया (खजिनदार डॉक्टर प्रतापराव कोठावळे सरचिटणीस श्री कालिका देवी मंदिर संस्था) यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

या प्रसंगी उत्तर महाराष्ट्रातील तालुकास्तरावरील प्रत्येकी एका पत्रकाराचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये यावल येथील पत्रकार अरुण पाटील यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजक समितीचे अध्यक्ष अशोक दुधारे व सचिव आनंद खरे यांनी कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.