भारतातही तुर्की प्रमाणे भूकंप होणार? IIT कानपूरच्या प्राध्यापकाचा खळबळजनक दावा…

0

 

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क:

सोमवारी ६ फेब्रुवारी २०२३ रोजी तुर्कस्तान आणि सीरिया या दोन देशांना भुकंपाचे तीव्र झटके बसले. यामुळे आतापर्यंत भूकंपात १६ हजारांहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. तर लाखो लोक जखमी झाले आहेत. मृतांच्या आणि जखमींच्या संख्येत वाढ होण्याची दाट शक्यता आहे. भूकंपामुळे दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी झाली. लाखो नागरिक बेघर झाल्याने जगभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

अश्यातच भरात भर म्हणून कानपूरच्या IIT प्राध्यापकाने एक खळबळजनक दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तुर्कस्तान आणि सीरियाप्रमाणे भारतातही लवकरच भूकंप होईल. त्यामुळे आपण सजग आणि सतर्क राहिले पाहिजे. त्यांच्या या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली असून असं कुठलंही संकट भारतावर येऊ नये, अशी प्रार्थना अनेकजण करीत आहेत.

गेल्या वर्षी भारताच्या अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. याबाबत आयआयटी कानपूरचे वरिष्ठ प्राध्यापक जावेद मलिक सांगतात की, येत्या काही दिवसांत देशात जोरदार भूकंप होण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर भूकंपाचा केंद्रबिंदू हिमालय, अंदमान निकोबार किंवा कच्छ असू शकतो असा त्यांचा दावा आहे. येणाऱ्या काळात आपण सजग आणि सतर्क राहिले पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

प्रोफेसर जावेद मलिक सांगतात की, देशात भूकंपासाठी पाच झोन तयार करण्यात आले आहेत. झोन 5 चे क्षेत्र सर्वात धोकादायक आहेत. तर झोन 2 सर्वात सुरक्षित मानला जातो. कानपूरबद्दल बोलायचे झाले तर कानपूर झोन 3 मध्ये येतो. ज्यावर भूकंपाचा थोडासा प्रभाव दिसतो. झोननुसार क्षेत्रांबद्दल बोलायचे झाल्यास, कच्छ, अंदमान आणि निकोबार, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि इतर जवळपासची राज्ये आणि शहरे झोन 5 मध्ये आहेत.

झोन 4 मध्ये बहराइच, लखीमपूर, पिलीभीत, गाझियाबाद, रुरकी, नैनिताल, लखीमपूर आणि इतर तराई क्षेत्रांचा समावेश आहे. झोन 3, कानपूर, लखनौ, प्रयागराज, वाराणसी, गोरखपूर, सोनभद्र, चंदौली आणि इतर जवळच्या शहरांबद्दल बोलत आहोत. झोन २ बद्दल बोलत असताना भोपाळ, जयपूर, हैदराबाद आणि इतर जवळची शहरे येतात.

एका हिंदी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्राध्यापक जावेद मलिक यांनी सांगितले की, जमिनीच्या आत असलेल्या टेक्टोनिक प्लेट्स जेव्हा एकमेकांशी टकरतात, तेव्हा त्यांच्यातील शक्तीने एक भयंकर ऊर्जा निर्माण होते आणि त्यामुळे भूकंप (Earthquake) होतो. जर उर्जा जास्त असेल तर भूकंपाचे जोरदार धक्के जाणवतात हे धक्के खूपच भयानक आणि धोकादायक असतात.

Leave A Reply

Your email address will not be published.