जळगावात अचानक पेट घेतल्याने व्हॅन जळून खाक

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील श्यामा प्रसाद मुखर्जी उद्यानाला लागून असलेल्या ठिकाणी आज सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास उभ्या असलेल्या ओमनी व्हॅनने अचानक पेट घेतल्याने परिसरात खळबळ उडाली . . यावेळी व्हॅन पूर्णपणे जळून खाक झाली . यात व्हॅनचे हजारोंचे नुकसान झाले. यावेळी महापालिकेचे अग्निशामक दलाच्या एका बंबाने आग आटोक्यात आणली . दरम्यान उड्डाण पुलाच्या खाली असणाऱ्या एका दुकानासमोर उभ्या असलेल्या व्हॅनने पेठ घेल्याचे वृत्त कळताच शेकडो नागरिकांनी याठिकाणी गर्दी केली. व्हॅन हि अमोल चौधरी यांच्या मालकीची असल्याचे कळते. अग्निशमन दलाचे प्रकाश चव्हाण, गंगाधर कोळी, गिरीश खडके, संजय तायडे यांनी आग विझविली

Leave A Reply

Your email address will not be published.