बहिणीने भावाला किडनी देऊन दिले जीवदान…

0

 

उस्मानाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क:

सख्या बहीण – भावाच्या नातेसंबंधातील अनोखा पैलू उलगडणारी एक अनोखी गोष्ट उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा येथे घडली आहे. मागील वर्षभरापासून आजारपणामुळे त्रस्त असलेल्या भावाचे जीव वाचविण्यासाठी बहिणीने किडनी देऊन अनोख्या ओवाळणीचे दर्शन घडवून आणले. किडनी देऊन बहिणीने भावाला जीवनदान दिल्याने या बहिणीच्या त्यागाचे कौतुक केले जात आहे. बिलकीस फेरोज कुरेशी या लग्नानंतर फलटण येथे स्थायिक झाल्या. आपली मुले, पती यांच्यासह सुखात असलेल्या बिलकीस कुरेशी यांना आपला भाऊ वाहेद इस्माईल सौदागर जीवघेण्या आजाराने त्रस्त असल्याचे समजले त्या वर त्यांनी कसलाच विचार न करता जेमतेम शिकलेल्या बिलकीस भावाच्या जीवासाठी स्वतःची किडनी देण्यासाठी तयार झाल्या. मुस्लीम समाजात शिक्षणाचे प्रमाण कमी त्यात जुन्या विचारांचा मोठा पगडा, तरी देखील बहीण-भावाच्या नात्याला कोणत्याच बंधनाची आडकाठी आली नाही.

वाहेद इस्माईल सौदागर यांच्या दोन्ही किडन्या वर्षभरापासून निकामी झाल्या होत्या. किडनी दान मिळावी यासाठी ते अनेक ठिकाणी प्रयत्न करीत होते. पण त्यांना काही किडणी मिळत नव्हती पुण्यात त्यांच्यावर उपचार सुरू होते, हळूहळू दिवस पुढे सरकत होते आणि किडनीची व्यवस्था होत नसल्याने सौदागर यांच्या कुटुंबीयांची बेचैनी वाढत होती. शेवटी सौदागर यांची सख्खी बहीण किडणी देण्यासाठी धावून आली. सगळ्या वैद्यकीय तपासण्या पूर्ण करून बिलकीस कुरेशी यांनी कोणताच विचार न करता निरपेक्ष भावनेने आपल्या भावाला किडनी देऊन नात्याची वीण आणखी घट्ट केली.

Leave A Reply

Your email address will not be published.