ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी बाबुराव हसुरे यांचे निधन…

0

 

कोल्हापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक थोरामोठ्यांनी आपले रक्त या देशासाठी सांडले आहे. आपल्या प्राणाची आहुती त्यांनी दिली आहे. या घटनेला एक काळ लोटला गेला आहे. मात्र जे काही स्वातंत्र्य सेनानी प्रत्यक्ष त्या लढ्यात सामील होते. त्यापैकी अनेक आता आपल्या वृद्धावस्थेत आहे.

त्यातीलच एक ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी बाबुराव पिरगोंडा हसुरे रा. कसबा सांगाव, तालुका कागल,  जिल्हा कोल्हापूर यांचे अलीकडेच वृद्धापकाळाने वयाच्या 96 व्या वर्षी निधन झाले.

स्वातंत्र्य सैनिकाचे बाबुराव पीरगोंडा हसुरे यांच्या कार्याचा आढावा आपण घेऊयात

त्यांचा जन्म दिनांक २८ जानेवारी १९२८ चा ते पूर्णपणे शेती व समाज सेवेत मग्न असायचे. त्यांनी याबरोबर अनेक पदे भूषवलेली होती.

१. संचालक कोल्हापूर जिल्हा स्वातंत्र्य सैनिक संघटना.

२. संचालक कोल्हापूर जिल्हा खादी ग्रामोद्योग समिती

३. संस्थापक संचालक. दादासाहेब मगदूम स्मारक समिती, कसबा सांगाव

४. चेअरमन, कुमार विद्या मंदिर कसबा सांगाव ..

त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात १९४२ व संघर्षामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती त्या बाबतची माहितीचा तपशील खालीलप्रमाणे.

१९४२ च्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये भूमिगत राहून देशासाठी काम केले. तसेच भारताने इंग्रजांविरुद्ध सन ८ ऑगस्ट१९४२ मध्ये इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरुद्ध राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली सुरू केलेल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये भारत छोड़ो चले जाव आंदोलनामध्ये अहिंसा तत्वावर कोल्हापूर जिल्ह्यांमधून देशभक्त रत्नाप्पा कुंभार, नागनाथ अण्णा नायकवडी, दादासाहेब मगदूम, शिवराम मर्दाने यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली करेंगे या मरेंगे या विचाराने सक्रिय सहभाग घेतला होता. सदर भारत छोड़ो आंदोलनामध्ये त्यांनी कसबा सांगाव व परिसरामध्ये गुप्त बैठका घेणे व गनिमी काव्याने योजना आखणे, सरकारी चावडी, पोस्ट ऑफि 2/3 करणे, टेलिफोनच्या तारा तोडून दळणवळण यामध्ये अडचणी करणे कार्यामध्ये त्यांचा हिरारीने सहभाग होता. सदर भारत छोडो आंदोलन मध्ये प्रभात फेरी काढून राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू त्यांची नावे घेऊन जय जय कार करणे, वंदे मातरम, भारत माता की जय चा नारा देणे. त्यावेळी पांढरी खादी टोपी घालण्यास बंदी होती पण ती न जुमानता ते घालत होते. दिनांक 9 जानेवारी 1943 रोजी रात्री साडेनऊ वाजता कसबा सांगाव, तालुका कागल येथील गावालगत महाराणी इंदुमती पार्क येथे रेसिडेन्सी होती. या पार्क भोवती तारेचे कुंपण होते तो पार्क हुपरी तळंदगे व सांगाव च्या चारी बाजूंनी व्यापलेला होता व त्यामध्ये सुंदर इमारत इंग्रजांचा नवा व जुना बंगला होता इंग्रजी अधिकारी तो वापरत होते तो बंगला जाळून टाकला सदर कामासाठी काही स्वातंत्र्यसैनिकांना अटक झाली. काही लोकांवर वॉरंट काढले. काही पसार झाले पण बाबुराव ह्सुरे जी शेवटपर्यंत भूमिगत राहुन सदर मोहिमेमध्ये काम केले. त्या वेळी त्यांना शंभर रुपयांचा दंड झाला. त्यावेळी कसबा सांगाव गावावर सात हजार 500 रुपयांचा सामुहिक दंड झाला होता. गावातील त्यांचे सहकारी रामचंद्र हेरवाडे, रूपचंद गुजर, महादेव कोरे, शिवराम मर्दान यांना त्यांनी भूमिगत राहून लपून जेवणाचा डबा पोहोचविण्याचे काम केले होते.

स्वातंत्र्याच्या प्रचारासाठी प्रभात फेरी काढणे, सूतकताई करणे, बुलेटीन वाटणे व इंग्रजी राजवटीविरुद्ध लोकांना चिथावणी देण्याच्या कामांमध्ये ते सहभागी झाले होते. सरकारी इमारतीवर तिरंगा ध्वज फडकवणे कामामध्ये सहभाग. कसबा सांगाव मध्ये 2 ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंती निमित्त हात चरखा द्वारे आठ दिवस सूतकताई केली होती. त्यानंतर जमवलेले सूत गावांमध्ये त्याची सवाद्य मिरवणूक काढून ते सूत गरजू लोकांना वाटत होते. त्याच बरोबर गारगोटी येथील सरकारी खजिना व हत्यारे लुटी मध्ये सहभाग.

 

Leave A Reply

Your email address will not be published.