दिल्लीसह उत्तर भारतात भूकंप, नेपाळमध्ये 6 ठार

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

दिल्ली एनसीआर (Delhi-NCR) भागासह उत्तर प्रदेशची (Uttar Pradesh) राजधानी लखनौ, कानपुर, मुरादाबाद, बरेली, आग्रा आणि मेरठसह अनेक भागात भूकंपाचे  धक्के (Earthquake) जाणवले. पहाटे 1.57 वाजता भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 6.3 मोजली गेली. दिल्ली-एनसीआर, यूपी आणि बिहारमध्ये (Bihar) हे धक्के जाणवले.

नेपाळमधील (Nepal) डोटी जिल्ह्यात भूकंपानंतर पहाटे 2:12 च्या सुमारास घर कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला. अनेक भागात एकापाठोपाठ तीन भूकंपाचे धक्के जाणवले. यानंतर पहाटे 3.15 वाजता पुन्हा 3.6 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के जाणवले.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार (National Center for Seismology) , पहाटे 1.57 वाजता झालेल्या या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळ, मणिपूर होता. या भूकंपाची खोली जमिनीखाली 10 किमी होती. विशेष म्हणजे दिल्ली एनसीआरसह अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले. पहाटे भूकंपाचे धक्के जाणवल्याने लोक घराबाहेर पडले. याआधीही लखनऊसह उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.9 इतकी मोजली गेली. त्याचा केंद्रबिंदू उत्तराखंडमधील भारत-नेपाळ सीमेवर जमिनीपासून 10 किमी खाली होता. मिळालेल्या माहितीनुसार, 8 नोव्हेंबर रोजी रात्री 8.52 च्या सुमारास हा भूकंप झाला.

याशिवाय मंगळवारीच पुन्हा 4.4 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला. सकाळी 11.57 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. त्याचे केंद्र चंफई, मिझोराम होते. रात्री लोक झोपले होते, तेव्हा अचानक या भूकंपाचे धक्के जाणवले. झोपलेल्या लोकांचे बेड अचानक थरथरू लागले, यानंतर घाबरलेले लोक घराबाहेर पडले

 

Leave A Reply

Your email address will not be published.