मोठी बातमी; डोंबिवलीतील इमारतीला भीषण आग

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

डोंबिवली येथील एका इमरातीला आग लागल्याची घटना घडली आहे. लोढा फेस २ च्या खोणी एस्ट्रेला टॉवरला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली आहे. आगीत पाच ते सहा मजल्याच्या गॅलरी जळून खाक झाल्या आहे. फायर ब्रिगेडच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

सातव्या मजल्यावर आग लागली होती. त्यानंतर ती इतर मजल्यांवर पसरत गेली. सुदैवाने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यापर्यंत लोक वास्तव्यास होते. आग लागल्याचे समजल्यानंतर सर्व रहिवासी सुखरूप बाहेर पडले आहे. आगीच्या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे सांगितले जाते. व्हिडिओमध्ये आगीचं भीषण रुप दिसून येत आहे. घटनेची माहिती मिळताच फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. जीवितहानीची कोणतीही माहिती नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.