व्यावसायिकाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

नवी मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका बांधकाम व्यावसायिकाने स्वतःच आपल्या डोक्यावर बंदुकीतून गोळी झाडून घेत आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरातच एकाच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सीवूड सेक्टर ४४ मध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. मनोज सिंग असं बांधकाम व्यावसायिकाच नाव आहे. ते अमन डेव्हलपर्सचे मालक होते. स्वतःच्याच कार्यालयात त्यांनी डोक्यात गोळी झाडून स्वत:चं जीवन संपलंय.

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मनोज गोळी लागून खाली कोसळलेल्या अवस्थेत सापडले. पोलिसांनी या प्रकरणी मृतदेह ताब्यात घेतला असून, शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तसेच पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.