जळगावात तीन वेगवेगळ्या घटनेत विवाहितेसह अन्य दोघांना मारहाण

0

जळगाव ;- शहरातील जिल्हापेठ,एमआयडीसी पोलीस स्टेशन आणि रामानंद नांगर पोलीस स्टेशन हद्दीत मारहाण करून दुखापत केल्याच्या तीन घटना घडल्या असून याप्रकरणी पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

तालुक्यातील शिरसोली येथील शिवदास उत्तम बारी वय ३४ या तरुणाला ११ जानेवारी रोजी संशयित भरत भानुदास बारी,सतीश भानुदास बारी दोन्ही रा. शिरसोली यांनी शिवदास बारी यांनी वापरण्यास दिलेली क्रुझर गाडीची करी मागितल्याचा राग येऊन दारूच्या नशेत शिवदास बारी यांना लोखंडी रोडने उजव्या हातावर मारहाण करून दुखापत केल्याची घटना जुना प्लॉट इंदिरा नगर भागात रात्री सडे आठ वाजेच्या सुमारास घडली होती . याप्रकरणी दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोहेकॉ समाधान टाहाकले करीत आहे.

दुसऱ्या घटनेत नवीन बंस स्टॅन्ड येथे सीटवर बसण्याच्या कारणावरून सुरेश गणपत पाटील रा. चांदसर ता. धरणगाव यांना आरोपी समाधान देविदास महाजन रा. पाळधी याने १२ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास चापतांबुक्क्यांनी मारहाण करून हात फ्रॅकचर केल्याची घटना घडली होती. याबाबत सुरेश पाटील यांनी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास महिला पोलीस नाईक सुवर्णाचे तायडे करीत आहे.

तिसऱ्या घटनेत हरिविठ्ठल नगर येथे शहनाज अजित तडवी वय २२ ह्या वडिलांच्या घरी असताना त्यांचे पती अजित तडवी हे १२ रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास येऊन पत्नी शहनाज हिला नांदायका का येत नाही असे सांगितल्यावर पत्नीने तुम्ही दारू सोडली आणि कामधंदा केल्यास तरच नांदायला येईल असे सांगितल्याचा राग आल्याने अजित तडवी याने पत्नीला चापटा बुक्क्यांनी मारहाण करून हातातील विळ्याने मानेवर मारून जखमी केले. याबाबत अजित तडवी यांच्या विरोधात राममंड नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोहेकॉ सुनील पाटील करीत आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.