तलावात पोहण्यास गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू ; जांभोरे येथील घटना

0

धरणगाव ;- धूलिवंदन खेळून आंघोळीसाठी गेलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी २५ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास तालुक्यातील जांभोरे गावाजवळ घडली

जितेंद्र माळी (वय २०, रा. लोहार गल्ली, धरणगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आई, वडील, भाऊ, बहिणीसह राहत होता. मोलमजुरी करून त्याचे वडील कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. सकाळी धूलिवंदन खेळल्यानंतर जितेंद्र हा आपल्या तीन ते चार मित्रांसोबत धरणगावजवळ असलेल्या जांभोरा गावालगत असलेल्या तलावावर पोहण्यास गेला होता. परंतु थोड्याच वेळात जितेंद्र बुडायला लागला. मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला वाचविण्यात अपयश आले.

धूलिवंदनच्या दिवशीच तरुण मुलाचा बुडून मृत्यू झाल्यामुळे मयत जितेंद्रच्या आई – वडिलांनी एकच आक्रोश केला होता. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. धरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.