नांदेड येथे वामन महाराज जन्मोत्सव उत्साहात

0

नांदेड, ता.धरणगाव;- येथे दरवर्षी प्रमाणे दि. 24 मार्च रोजी वामन महाराज यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वामन महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त दरवर्षी येथे यात्रा भरते. यात्रेनिमित्त असंख्य भाविकांनी पुजा व दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती. वामन महाराज यांच्याकडे भाविक जी मागणी करतात त्यांची इच्छा पूर्ण होते अशी ख्याती आहे.

सालाबादाप्रमाणे येथे दि. 24 रोजी वामन महाराज जन्मोत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. अन्नदान करणारे भाविक येथे मोठ्या प्रमाणावर आहेत. वामन महाराज जन्मोत्सव यात्रेचे आयोजक डॉ. पृथ्वीराज सैंदाणे हे या यात्रोत्सवासाठी प्रयत्न करीत असतात. या वर्षी दिलीपराव नन्नवरे (रवंजे बु.) यांनी अन्नदान दिले. यावेळी वामन महाराज यांची आख्यायिका वाचण्यासाठी चोपडा येथील ललित कला केंद्राचे प्रा. संजय नेवे सहभागी झाले होते. महाराजांच्या समाधीची महापुजा दिलीपराव नन्नवरे यांच्याहस्ते संपन्न झाली. यावेळी वामन महाराज यांची बहिण कमलबाई मोरे, सतिष मोरे, प्रभाकर मोरे, विलास मोरे, उज्ज्वला ब्राम्हणे, सुनिता अंभोरे, राजेंद्र सैंदाणे, सुमन मोरे, सुरज संदानशिव, प्रा.दिलदार सैंदाणे, कॅप्टन अनिल मोरे, जितेंद्र मोरे, दीपक वाघ, युवराज चव्हाण, भिमराव नन्नवरे, संजय कदम, पितांबर नन्नवरे, अनिल सैंदाणे, पांडुरंग लाखे सोनवदकर, गौतम शिंदे, विलास टेके, युवराज सैंदाणे, सिध्दार्थ सैंदाणे, मनोहर वाघ, मधुकर सोनवणे, बापु सोनवणे, तहसीलदार अंभोरे, प्रभाकर मोरे, नांदेड ग्रा. पं सदस्य सुनील चिंतामण सैंदाणे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.