बस आणि डंपरची जोरदार धडक, १२ जण ठार, तर १४ प्रवासी जखमी

बस पलटी होऊन भीषण आग

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यात बुधवारी रात्री भीषण अपघाताची भीषण घटना घडली. बस आणि डंपरमध्ये भीषण अपघात झाला आहे. अपघातानंतर बस पलटी झाली अन आग लागली. यामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला. तर १४ प्रवासी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच उपस्थितांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. जखमी प्रवाशांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आली आहे. सध्या सर्व जखमींची प्रकृती स्थिर समोर येत आहे.

स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बस आणि डंपरचा अपघात बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. गुना – आरोन महामार्गावर हा भीषण अपघात झाला. डंपर महामार्गावर उलट्या दिशेने येत होता. त्यावेळी डंपरने प्रवाशी बसला जोरदार धडक दिली. डंपरची धडक बसल्यामुळे बस पलटी झाली. त्यानंतर बसला भीषण आग लागली. या आगीमध्ये १४ जणांचा होरपळून मृत्यू झाला.

गुना येथे झालेल्या भीषण अपघातावर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दुःख व्यक्त केले. त्याशिवाय आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी एक्स (ट्विटर) वर म्हटलेय, गुणांवरून आरोनला जाणाऱ्या बसमध्ये भीषण आग लागल्यामुळे प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं समजलं, हे वृत्त वाचून दुःख झाले. या हृदय विदारक अपघातामध्ये मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांच्या दुखा:त सहभागी आहे.

मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव म्हणाले की, अपघामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांवर उपचारासाठी सर्व मदत करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्याशिवाय या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेय. अशाप्रकारची दुर्घटना पुन्हा घडू नये म्हणून या अपघाताची चौकशी होणं गरजेचं आहे.

मदतीची घोषणा
मुख्यमंत्री मोहन यादव यांनी जिल्हा प्रशासनाला अपघाताल मृतांच्या कुटुंबियांना ४-४ लाख देण्याचे आदेश दिले आहे. त्याशिवाय जखमींना ५०-५० हजारांची मदत देण्याची निर्देश दिले आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.