लोकशाही न्यूज नेटवर्क
भारतात गेल्या २४ तासांत कोविड-१९ चे ६९२ नवीन रुग्ण आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ४,०९७ वर पोहोचली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशात सहा मृत्यूची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात दोन आणि दिल्ली, कर्नाटक, केरळ, आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी एक मृत्यूची नोंद झाली आहे.
जानेवारी २०२० मध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्यापासून भारतात कोरोनाव्हायरसच्या एकूण रुग्णांची संख्या ४, ५०, १०, ९४४ वर पोहोचली आहे. भारतातील कोविद-१९ प्रकरणांमुळे एकूण मृतांची संख्या ५,३३,३४६ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत सहा मृतांची संख्या वाढली आहे.
बुधवारी, दिल्लीत कोविड-१९ उप-प्रकार JN.1 चे पहिले प्रकरण नोंदवले
“दिल्लीत Omicron चे सब-व्हेरियंट JN.1 चे पहिले प्रकरण नोंदवले गेले आहे. जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवलेल्या तीन नमुन्यांपैकी एक JN.1 आहे आणि दोन Omicron आहेत,” असे दिल्लीचे आरोग्य मंत्री सौरभ भारद्वाज यांनी सांगितले.