माजी मंत्री गुलाबराव देवकरांनी दिला जिल्हा बँक अध्यक्षपदाचा राजीनामा

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाचा एक वर्षांचा कार्यकाळ संपल्याने आज ७ रोजी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी राजीनामा दिला असून जिल्हा बँकेच्या पुढील अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, संजय पवार,यांची नावे चर्चेत आहेत.आता नवीन चेअरमनपदी कुणाची वर्णी लागते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

माजीमंत्री गुलाबराव देवकर हे सोमवारी राजीनामा देणार असल्याची चर्चा होती. त्यांनी आज आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.  जिल्हा बँक च्या निवडणुकीत शिवसेनेला दोन वर्ष तर राष्ट्रवादीला तीन वर्ष असा अध्यक्षपद देण्याचा निर्णय घेण्यात आला होता . आता मात्र शिवसेनेचे दोन गट पडले आहे. जिल्हा बँकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वाधिक 11 जागा निवडून आलेल्या आहेत.तर त्या खालोखाल 6 जागा शिवसेना आणि काँग्रेसच्या 3 जागा निवडून आलेल्या आहेत. तर भाजपची एक जागा निवडून आलेली आहे.

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा एक वर्षाचा कार्यकाळ संपुष्ठात आला आहे. जिल्हा बँक निवडणुकीवेळी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाबाबत फॉर्म्युला निश्चित केला होता. त्यानुसार तीन वर्ष विभागुन राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष राहील तर दोन वर्ष शिवसेनेचा अध्यक्ष, तसेच तीन वर्ष शिवसेनेचा उपाध्यक्ष आणि उर्वरीत दोन वर्ष काँग्रेसचा उपाध्यक्ष असे ठरले होते. त्यानुसार शनिवारी दि. 4 रोजी जिल्हा बँकेच्या संचालकांची बैठक राष्ट्रवादीचे नेते आ.एकनाथराव खडसे यांच्या अध्यक्षतेखाली झाली या बैठकीत सोमवार दि. 6 रोजी कार्यकाळ संपल्याने गुलाबराव देवकर अध्यक्षपदाचा राजीनामा देतील असे ठरले होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.