मोठी बातमी.. बाळासाहेब थोरातांचा राजीनामा

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

काँग्रेसमध्ये मोठा भूकंप आला आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याची मोठी बातमी आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीदरम्यान काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला होता. यावरून आता काँग्रेसमध्ये वाद विकोपाला गेल्याचे चित्र समोर येत आहे.

नाशिक पदवीधरमध्ये सत्यजित तांबेंच्या उमेदवारीवरून प्रदेश काँग्रेसच्या दोन मोठ्या नेत्यांमध्ये वाद निर्माण झाला होता. सत्यजित तांबेंच्या वतीनं आता त्यांचे मामा बाळासाहेब थोरात रिंगणात उतरले होते. तसेच नाना पटोले यांच्या विरोधातली नाराजी त्यांनी बोलून दाखवली. दरम्यान, बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेत्याचा राजीनामा दिला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.