‘पहाटेचा शपतविधी आमचा गेम करण्यासाठीच’; देवेंद्र फडणवीस

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पहाटेच्या शपथविधीची चर्चा अजूनही सुरूच आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक वहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहे. पहाटेचा शपविधी हा शरद पवारांचा (Sharad Pawar) डाव होता. असा मोठा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. एवढेच नाही नाही तर, भाजप आणि राष्ट्रवादीचं सरकार करण्यासाठी शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली होती. पण शपथविधीच्या तीन-चार दिवस आधी ऐनवेळी पवारांनी माघार घेतली, असा धक्कादायक खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी केला. शिवाय सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.

उद्धव ठाकरेंनीच पाठीत खंजीर खुपसला
शरद पवार यांनी पाठीत खंजीर खुपसला का? असा प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले’ उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली ती दगाबाजी होती. त्यांनी पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले. शरद पवार आमच्यासोबत निवडून आलेले नव्हते. त्यांनी आमचा वापर केला असून, वापर कसा करावा त्याची रणनीती शरद पवार यांनी केली व आमची दिशाभूल केली. एकप्रकारे आमचा डबलगेम करण्यात आला होता. मात्र आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम उद्धव यांनीच केले आहे.

शरद पवारांना विश्वासात घेऊनच शपथविधी
शपथविधीची तयारी झाल्यामुळे अजित पवारांना (Ajit Pawar)आमच्यासोबत येण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे मी आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. शरद पवारांनी पुढाकार घेतला होता. सर्व गोष्टी ठरल्या होत्या. शपथविधीसाठी शरद पवार येतील असे अजित पवारांना वाटले होते. सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न हा राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress) सर्वेसर्वा शरद पवारांना विश्वासात घेऊनच केला, असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.