पुण्यात झालेल्या कोयत्या हल्ल्यानंतर पोलिसांची मोठी कारवाई….

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

मंगळवारी सकाळी एका तरुणीवर माथेफिरूने कोयत्याने वार केला. आणि पुण्यात खळबळ उडाली. तरुणीवर वार करण्याऱ्या तरुणाचे नाव शंतनू जाधव आहे. तरुणीवर हल्ला प्रकरणी आता पोलीस हवालदारासह तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या पोलीस अधिकाऱ्यांवर कर्तव्यास कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. हवालदार सुनील शांताराम ताठे, पोलीस कर्मचारी प्रशांत जगदाळे आणि सागर नामदेव राणे अशी निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या पेरूगेट पोलीस चौकीत एकही पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित नव्हता. तसेच बिट मार्शल यांनी देखील घटनास्थळी यायला २० मिनिटे लावली. यामुळे हि कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त संदीप गिल यांनी दिली. दर्शना हत्याकांडानंतर अजून हा धक्कादायक प्रकार घडल्यामुळे पोलीस यंत्रणेवर बरेच प्रश्न उपस्थित केले गेले आहे. शेवटी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतो.

 

Leave A Reply

Your email address will not be published.