धारदार चाकुसह इसम जेरबंद

पाचोरा डी. बी. पथकाची कारवाई

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क 

तालुक्यातील वडगाव टेक येथुन एका ३५ वर्षीय इसमास धारदार चाकुसह जेरबंद करण्यात आले आहे. सदरची कारवाई पाचोरा पोलिस स्टेशनचे डी. बी. पथकाने केली आहे.

पाचोरा तालुक्यातील वडगाव टेक येथे धारदार चाकुसह एक इसम फिरत असल्याची गोपनीय माहिती पाचोरा पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक अशोक पवार यांना मिळाली. सदरची माहिती मिळताच पो. नि. अशोक पवार यांनी पोलिस उपनिरीक्षक परशुराम दळवी, पोलिस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंपी, पो. हे. काॅ. शामकांत पाटील, पोलिस नाईक सचिन पवार यांचे पथक तयार करत घटनास्थळी रवाना केले.

पथकाने वडगाव टेक येथे सापळा रचून देविसिंग उर्फ महिपाल आत्माराम पाटील (वय ३५, रा. वडगाव टेक ता. पाचोरा ह. मु. गुरुकृपा नगर, राजुभाई चाळ, मेधानी नगर, सुरत,अहमदाबाद) यास ताब्यात घेऊन त्याची झळती घेतली असता त्याचे जवळ एकुण लांबी २३ इंच, पात्याची लांबी १६ . २ इंच, ६ . २ इंच मुठ व ३ से. मी. रुंदीचा धारदार चाकु देविसिंग पाटील याचे कमरेला आढळुन आला. देविसिंग पाटील यास ताब्यात पथकाने जेरबंद केले आहे.

या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल शामकांत पाटील हे करीत आहे. लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असतांनाच पाचोरा तालुक्यात धारदार चाकुसह इसम आढळून आल्याने पुढील होणारा अनर्थ पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अशोक पवार व डी. बी. पथकाने केलेल्या कारवाईमुळे टळला आहे. या कारवाईमुळे पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अशोक पवार व पोलिसांचे डी. बी. पथक यांचे अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.