दिलासादायक : सोन्याच्या दरात मोठा बदल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

गेल्या दिवसांपासून सोन्याचे भाव  गगनाला पोहचले होते. आता मोठा दिलासा मिळाला आहे. सोन्याच्या भावात आता घसरण पाहायला मिळत आहे. आज 29 एप्रिल 2024 रोजी भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदी स्वस्त झाले आहे. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत आज 71, 550 रूपये आहे. तर काल (28 एप्रिल) ही किंमत 72, 950 रूपये प्रति 10 ग्रॅम होती. त्याचबरोबर जर आज 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत पाहायची झाली तर ती 65, 468 रूपये आहे. चांदीची किंमत आज 82, 500 रूपये प्रति किलोने आहे.

मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत 81, 160 रूपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती देशभरात बदलतात. एका बाजूला देशांतर्गत बाजारात सोन्या चांदीचे दर वाढत आहेत, तसंच दुसऱ्या बाजूलाही म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. या दरम्यान, अक्षय तृतीयेचा सण जवळ आला आहे. यामुळे सोन्याच्या दरात झालेली घसरण सर्वसामान्यांच्या फायद्याची ठरत आहे.

जळगाव सुवर्णनगरीतील सराफा व्यापारांनी दिलेल्या माहितीनुसार, आजचे सोन्याचे दर 71,420 रुपये आहे तर चांदीचे दर 71,420 रुपये आहे.

मुंबईत 22 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत 65, 468 रूपये आहे. तर, 24 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत 71, 320 रूपये, चांदी 82,130 रुपये प्रति किलो.

दिल्ली – 24 कॅरेट सोने – 71, 250 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 82,010 रुपये प्रति किलो

पुणे- 24 कॅरेट सोने – 71, 370 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 82,150 रुपये प्रति किलो

कल्याण- 24 कॅरेट सोने – 71, 370 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 82,150 रुपये प्रति किलो

ठाणे- 24 कॅरेट सोने – 71, 370 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 82, 150 रुपये प्रति किलो

नागपूर – 24 कॅरेट सोने – 71, 370 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 82, 150 रुपये प्रति किलो

सोलापूर- 24 कॅरेट सोने – 71, 400 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 82, 180 रुपये प्रति किलो

Leave A Reply

Your email address will not be published.