अजित पवारांच्या शब्दाला कुठलीही किंमत राहिली नाही; फडणवीसांचा हल्लाबोल

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget session) उद्यापासून सुरू होत आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी राजकीय पक्षांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. आज भाजपची बैठक पार पडली आणि त्या बैठकीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेतली.

या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अजित पवारांच्या शब्दाला किंमत नाही देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज विशेषत: महाराष्ट्रातील शेतकरी हवालदील आहे. ज्याप्रकारे वीजेचे कनेक्शन कापण्याचं काम या सरकारने सुरू केलं आहे. आमच्या लक्षात आलं आहे की, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शब्दाला कुठलीही किंमत राहिली नाहीये.

मागच्या मागच्या अधिवेशनात अजित पवारांनी पहिल्या दिवशी सांगितलं की, वीज कनेक्शन कापण बंद आणि शेवटच्या दिवशी सांगितलं सुरू. तर मागच्या अधिवेशनात सांगितलं की, त्यावेळी मी चुकीचं बोललो होतो पण आज ठामपणे सांगतो की, शेतकऱ्यांचे वीजेचे कनेक्शन आम्ही कापणार नाही. पण आता जणूकाही स्पर्धा लागली आहे अशा प्रकारे शेतकऱ्याचे वीजेचे कनेक्शन कापले जात आहे. शेतकऱ्याला अक्षरश: आपलं उभं पिक जळताना पहावं लागत आहे.

आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी

आम्ही शेतकऱ्यांच्या पाठिशी देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, याच्या व्यतिरिक्त आम्ही जाब विचारणार आहोत, सावकारी सरकार आहे. ऊर्जामंत्री ज्याप्रकारे विधान करत आहेत ते पाहून आपण लोकशाहीत आहोत की तानाशाहीत आहोत असा प्रश्न उभा राहतो. ज्या शेतकऱ्यांच्या भरवषावर तुम्ही राज्य करता आणि आम्ही सर्व निवडून येतो.

त्यांच्याबाबतीत इतकी असंवेदनशीलता… आम्ही कनेक्शन कापणारच… ही भूमिका राज्य सराकारने घेतली आहे ती अहंकारी भूमिका आम्ही तोडायला लावू आणि शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहू. शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाहीये.

शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे. मराठवाड्यापासून पश्चिम महाराष्ट्रात सर्वत्र गाळप न झालेल्या ऊसाचा एक मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. या शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे ही आमची मागणी असणार आहे. यासोबतच राज्य सरकारने आधी जाहीर केल्याप्रमाणे महात्मा फुले योजनेच्या अंतर्गत ज्यांची कर्जमाफी झाली आहे त्यांना कर्जमाफी आणि नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान हे सरकारने दिलेलं नाहीये तेही सरकारने दिलं पाहिजे. या संदर्भातही आमचा अधिवेशनात आग्रह असणार आहे असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

नवाब मलिकांनी मुंबईच्या खुन्यांशी व्यवहार केला देवेंद्र फडणवीस म्हणाले, बॉम्ब स्फोटातील आरोपी, दाऊद इब्राहिमच्या सहकाऱ्यासोबत मनी लॉन्ड्रिंग करण्याच्या आरोपाखाली राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना अटक झाल्यावर अख्ख राज्य सरकार त्यांच्या पाठिशी उभं आहे. कुणाला वाचवायला? तर ज्यांनी दाऊद इब्राहिमला सहकार्य केलं. मुंबईच्या खुन्यांशी ज्यांनी व्यवहार केला त्यांना वाचवायला अख्ख सरकार उभं राहिलं आहे. देशात असं कधी घडलं नाही की, पोलीस कोठडीत गेल्यानंतरही मंत्रिपदावर व्यक्ती कायम आहे.

नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी सभागृहात संघर्ष करणार देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, एकप्रकारे राज्य घटनेचा अवमान हे सरकार करतंय. मला आश्चर्य वाटत आहे, ज्या सरकारचे प्रमुख शिवसेनेचे नेते आहेत ते सरकार मुंबईच्या खुन्यांसोबत व्यवहार करणाऱ्यांच्या पाठिशी उभं आहे ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. म्हणून आम्ही ही मागणी लावून धरणार आहोत की, नवाब मलिक यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे. मुंबईच्या खुन्यांशी व्यवहार कुठल्याही परिस्थितीत मान्य केला जाऊ शकत नाही. त्यामुळे भाजप ठामपणे हा राजीनामा झाला पाहिजे याकरता सभागृहात संघर्ष करेल.

Leave A Reply

Your email address will not be published.