प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत गाडेगांव – घिर्णी – उमाळी रस्त्याचे भूमिपूजन.

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

मलकापुर:-प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (PMGSY) अंतर्गत मलकापुर तालुक्यातील राज्य महामार्ग ७५३ ए (गाडेगांव) घिर्णी – उमाळी रस्ता दर्जोन्नत करणे या विकास कामाचे आ.राजेश एकडे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. सदर रस्ता विकास कामासाठी रु.१७४.४२ लक्ष निधी मंजूर करण्यात आलेला असुन, त्यामुळे गाडेगांव, घिर्णी, उमाळी व परिसरातील नागरिकांचा प्रवास सुखकर होणार आहे.

यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे, आ.राजेश एकडे,बंडूभाऊ चौधरी,विलास पाटील, उमरावसिंग राजपुत, अशोक मराठे, माणिकराव वणारे, जानराव वनारे, भिमराव आत्माराम इंगळे, भिकाजी तायडे, ईश्वरसिंग राजपुत, छन्नुसिंग राजपुत, डॉ.राजेंद्र राऊत, संतोषराव मराठे, मधुकर इंगळे, बाबुराव इंगळे, देवराव सोनोने, संतोष सोनोने, शिवाजी लोखंडे, वसंता गव्हाळे, गजानन इंगळे, राजु बोपले, अमोल इंगळे ई. उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.