२१ वर्षीय तरुणाची गळफास घेत आत्महत्या

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी जवळील हनुमान नगर परीसरात एका २१ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोद करण्यात आली आहे.

ज्ञानेश्वर अर्जुन पाटील (वय २१) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. शहरातील रामेश्वर कॉलनी, मेहरूण परिसरातील हनुमान नगरात ज्ञानेश्वर पाटील या तरुणांने दि.१ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घरात कोणी नसताना छताला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्याचे कारण अद्याप समजले नाही.

ज्ञानेश्वर हा जळगाव शहरातील फुले मार्केट येथे एका भांड्यांच्या दुकानात कामाला होता. त्याच्या पश्चात आई, वडील, २ बहिणी १ लहान भाऊ असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.