चिमुकल्या मावळ्यांनी सर केले कळसुबाई शिखर आणि सांधन व्हॅली

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

मलकापुर :-शिवजयंतीच्या पावन तिथीला मलकापूर येथील धैर्य ब्रिजेश अग्रवाल,अनिष तेजांशु सरोदे,राम अलीन शुरपाटणे , कृष्ण सचिन शुरूपाटणे, क्रिश कुणाल महाजन, दर्शन निलेश पाटील वय नऊ ते दहा वर्षे या चिमुकल्या मावळ्यांनी पहिल्या दिवशी आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी समुद्र सपाटीपासुन चौपन्नशे फुट उंच दरी सांधन व्हॅली तर लागोपाठ दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई  हे  साडेतीन तासात सर केले.

हइतिहास आणि भुगोल हे फक्त अभ्यासण्याचे विषय नसून ते प्रत्यक्षात अनुभवता यावे या हेतूने येथील पाच बालकांनी काही तरी वेगळे करण्याचे ठरविले.याला त्यांचे पालक आणि “हॅपी माईंड फाऊंडेशन ” ने पाठबळ दिले.

हॅपी माईंड फाउंडेशन मुक्ताईनगर या संस्थेने साथ देत ही मोहीम फत्ते केली

सोबत डॉ ब्रिजेश अग्रवाल ,डॉ तेजांशु सरोदे, विवेक ठाकुर, डॉ शुभांगी फिरके ,नीता अग्रवाल , डॉ नितीन पाटील, अनिल शुरपाटणे , निलेश पाटील, गणेश पाटील , भंगाळे, तेजश्री खर्चे आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.