गाडगे बाबांचे विचार समाजात पोहचवा :- ह.भ.प.सुधाकर बाहे महाराज

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

अमरावती; गाडगे नगर येथील श्री संत गाडगे महाराज समाधी मंदिरावर तिथीनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी संत गाडगेबाबा जयंती चे आयोजन करण्यात आले होते  . त्यानिमित्ताने ह. भ. प. सुधाकर बाहे महाराज यांचे संत गाडगे बाबा जीवन चरित्रावर किर्तन पार पडले. त्यांनी आपल्या कीर्तनातील पहिले पुष्प गुंफताना गाडगे महाराज  नेहमी अंधश्रद्धेवर प्रहार करून स्वच्छतेच्या माध्यमातून संदेश देऊन मानवामध्ये भेदाभेद करू नका .

मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे .भक्ती करायचीच असेल तर गोरगरीब निराधार लोकांची सेवा करा. गाडगे महाराजांच्या दशसूत्री कलमांचे पालन करा. बेकारांना रोजगार ,पशु ,पक्षी, मुक्या प्राण्यांना अभय, गरीब तरुण-तरुणींचे लग्न ,दुखी व नीराशांना हिम्मत हा दशसूत्री संदेश देऊन अंधश्रद्धेची घाण आपल्या कीर्तनाच्या खराट्याने साफ करणारे संत गाडगेबाबा !

काही माणसे ही ध्येय वेडी असतात हीच माणसं समाज परिवर्तन घडवून आणतात .समाजातील काही ध्येय वेड्या पैकी एक म्हणजे संत गाडगेबाबा ! सामान्यातून व सामान्य पर्यंत ते पोहोचलेले स्वतःची शक्ती, युक्ती, बुद्धी आणि शरीर त्यांनी समाज उद्धाराच्या कार्यावर खर्ची घातली .

संपूर्ण देशाला स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या गाडगे महाराजांचे विचार आत्मसात करून समाजामध्ये पोहोचवा असे आवाहन यावेळी ह. भ. प. बाहे महाराज यांनी केले . यावेळी हार्मोनियम वादन ज्ञानेश्वर सौदागरे   ,  तबला हनुमंत तांबसकर  जनार्दन पवार , बबनराव चव्हाण , प्रकाश लुंगे ,  संजय सोसे , विजय गारपवार   आदींनी साथ संगत केली.

व गाडगे महाराजांच्या महाआरतीने व उपस्थितांना फराळ देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली . या कार्यक्रमाचा असंख्य भाविक भक्तांनी श्रवण भक्तीचा लाभ घेतला .

Leave A Reply

Your email address will not be published.