शेअर मार्केट कोसळले, गुंतवणूकदारांना एक लाख कोटींचा फटका

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

रशिया युक्रेन युद्धाचा (Russia Ukraine Crisis) परिणाम आणि शेअर विक्रीचा दबाव शेअर मार्केटवर (Stock Market ) होताना दिसून येत आहे.

आज शेअर मार्केट सुरू होताच शेअर बाजार कोसळला. शेअर मार्केट सुरू होताच पहिल्याच सत्रामध्ये बाजार तब्बल 900 अकांनी कोसळला. तर निफ्टी देखील 16600 च्या खाली आली. पहिल्या सत्रात काही वेळ बँकिंग, ऑटो आणि फार्मा क्षेत्रात तेजी दिसून आली मात्र त्यानंतर शेअरबाजार कोसळला. सेन्सेक्स (Sensex) 900 अंकांनी कोसळल्यामुळे गुंतवणूकदारांचे तब्बल 1 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

बुधवारी शेअर मार्केट सुरू होताच हेवीवेट, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, एशियन पेंट्स आणि इंफोसिस यांचे शेअर घसरले तर टाटा स्टील, एम अँड एम, रिलायंस इंडस्ट्रीज यांच्या शेअरमध्ये तेजी दिसून याली. गेल्या सात दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाचा परिणाम केवळ भारतीय शेअर बाजारावरच नव्हे तर संपूर्ण अशिया खंडातील शेअर बाजारावर झाल्याचे पहायला मिळत आहे.

गुंतवणूकदारांना एक लाख कोटींचा फटका

बुधवारी शेअर बाजार सुरू होताच पहिल्या सत्रात सेंन्सेक्स तब्बल 900 अंकांनी कोसळला तर निफ्टी देखील सोळा हजारांच्या खाली आली. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. गुंतवणूकदारांचे तब्बल एक लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या आठवड्याच्या सोमवारी बीईएसई लिस्टेड कंपनीची एकूण मार्केट कॅप 52,39,045.09 कोटी रुपये इतकी होती. त्यामध्ये बुधवारी तब्बल 1,07,172.82 कोटी रुपयांची घट झाली आहे. बुधवारी मार्केट कॅप 2,51,31,872.27 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.