शिक्षकाने लाटला शासनाचा मलिदा; माहिती अधिकार कायदायान्वये उघड !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

मलकापुर:-ऊर्दू गर्ल्स हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयचे शिक्षक मो. शफीक अ. कादर रा. मलकापूर हे दि. 05 फेब्रु 19 रोजी मा.जिल्हा अधिकारी साहेब यांचे दालनात तामीर मिल्लत ऊर्दू प्राथमिक शाळा मलकापूर चे सुरू असलेल्या प्रकरणात हजर होते.तसेच त्यांनी मा.सदर प्रकरणाचे रोजनाम्यावर हजर असल्याबाबत स्वाक्षरी सुध्दा केलेली आहे व दि. 12 फेब्रुव19 रोजी मा.जिल्हा अधिकारी साहेब बुलढाणा येथील तामीर मिल्लत ऊर्दू प्राथमिक शाळा सुरू असलेल्या प्रकरणात हजर होते.

तसेच ऊर्दू गर्ल्स हायस्कूलचे हजेरी रजिस्टरची पाहणी केली असता असे निर्देशनास आले आहे कि,मो. शफीक अ. कादर बारावी वर्गाचे प्रक्टिकल ची परीक्षा घेण्यासाठी External Examiner म्हणून जळगाव जामोद येथे गेल्याचे हजेरी रजिस्टर वर दर्शविलेल आहे.परंतु ते त्याठिकाणी हजर नव्हते. या बाबत  यापूर्वीही या शिक्षक विरुध्द दि. 25 नोव्हें 20 रोजी रजिस्टर पोस्टाने  मा. शिक्षक अधिकारी व उप संचालक अमरावती तसेच मा. शिक्षक अधिकारी बुलढाणा, पोलीस निरीक्षक,पोलिस स्टेशन मलकापूर यांना सुध्दा लेखी तक्रार केली होती. तरी या गैरकारभार बाबत दि. 24 फेब्रु 22रोजी मा. शिक्षणधिकारी व उप संचालक साहेब अमरावती यांना लेखी तक्रार दिली होती.

तरी मे.साहेब नियमावली 1981नुसार या शिक्षका विरुध्द कारवाई करण्यात यावी अशी निवेदनाद्वारे  सै. वसीम सै.रहीम रा.अब्दुल हमीद चौक, मलकापूर यानी जिल्हा अधिकारी बुलढाणा यांच्याकडे केली असून 15 दिवसाच्या आत कारवाई न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा देण्यात आला असूनयांची सर्वस्व जबाबदारी आपल्या कार्यालयाची राहील. असा इशारा निवेदन द्यारे सै. वसीम सै. रहीम यांनी दिला आहे

Leave A Reply

Your email address will not be published.