दिल्लीत आणखी एका तरुणीचा दिवसाढवळ्या खून…

0

 

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

दिल्लीत आणखी एका मुलीच्या हत्येचे प्रकरण समोर आले आहे. शुक्रवार, 28 जुलै रोजी मालवीय नगर परिसरातील अरबिंदो कॉलेजजवळील उद्यानात एका मुलीला रॉडने बेदम मारहाण करण्यात आली. आरोपी हा तरुणीचा मावस भाऊ असून त्याला तिच्याशी लग्न करायचे होते. मात्र, मुलीने लग्नाचा प्रस्ताव नाकारला. हत्येनंतर आरोपीने स्वतः पोलीस ठाणे गाठून आत्मसमर्पण केले. पोलिसांच्या चौकशीत आरोपीने अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, 28 वर्षीय इरफान असे आरोपीचे नाव आहे. नरगीस असे मुलीचे नाव आहे. इरफानने पोलिसांना सांगितले की, “मी नर्गिसला लग्नासाठी प्रपोज केले होते, पण तिने नकार दिला. नर्गिसचे कुटुंबीय माझ्याशी लग्न करायला तयार नव्हते. त्यामुळे नर्गिसने माझ्याशी बोलणेही बंद केले. मी नर्गिसला पार्कमध्ये भेटायला बोलावलं. आणि रागाच्या भरात नर्गिसची हत्या केली.”

 

लग्न न केल्याने इरफान संतापला होता

आरोपी इरफानची आई आणि नर्गिसची आई या सख्ख्या बहिणी आहेत. यामुळे दोन्ही मावस भाऊ-बहीण झाले. आरोपी संगम विहार येथील रहिवासी असून स्विगीमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. नर्गिसने लग्नास नकार दिल्यामुळे आणि त्याचे लग्न कुठेही जमत नव्हते, असेही आरोपीने सांगितले. अशा परिस्थितीत तो संतापला. आणि तणावाखाली त्याने नर्गिसची हत्या केली.

तीन दिवसांपूर्वी खुनाचा कट रचला होता

पोलीस चौकशीत आरोपीने तीन दिवस अगोदर हत्येचा कट रचल्याचे सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नर्गिस स्टेनो कोर्स करत असल्याचे इरफानला माहीत होते. मालवीय नगरच्या उद्यानातून ती तिच्या क्लासेसला जाते. शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास तो उद्यानात पोहोचला आणि नर्गिसला बोलण्यासाठी बोलावले. नर्गिसने बोलण्यास नकार दिल्याने त्याने पिशवीतून लोखंडी रॉड काढून तिच्यावर हल्ला केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येनंतर आरोपी स्वत: पोलिस स्टेशनमध्ये पोहोचला. नर्गिसने यावर्षी कमला नेहरू कॉलेजमधून आपले शिक्षण पूर्ण केले. ती मालवीय नगर येथून स्टेनो कोचिंग करत होती.

 

पार्कमधील बेंचखाली नर्गिसचा मृतदेह पडून होता

दक्षिण दिल्लीचे डीसीपी चंदन चौधरी म्हणाले- घटनेची माहिती शुक्रवारी दुपारी 12.08 वाजता मिळाली. मालवीय नगरच्या शिवालिक ए ब्लॉकच्या विजय मंडळ पार्कमध्ये एका व्यक्तीने मुलीच्या डोक्यावर लोखंडी रॉडने हल्ला केल्याचे सांगण्यात आले. घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. नंतर तो स्वत: पोलीस ठाण्यात आला आणि आत्मसमर्पण केले. ही बातमी मीडियामध्ये पसरल्यानंतर आरोपी स्वत: पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.