जळगाव;- जिल्हा पोलीस दलातर्फे अनेक गुन्हे उघडकीस आले असून या गुन्ह्यातील आरोपींकडून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल त्या त्या संबंधित व्यक्तींना सुपूर्द करण्यात आला. शुक्रवारी २८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत तक्रारदारांना मुद्देमाल परत करण्यात आला. अनेक वर्षानंतर किंमती वस्तू परत मिळाल्यानंतर तक्रारदारांनी आभार मानले. गहाळ व चोरी झालेले ११५ मोबाईल, दोन चोरीच्या दुचाकी आणि चैन स्नॅचिंगमध्ये गेलेली सोन्याचे चैन आदी मुद्देमाल परत करण्यात आला.
न्यायालयाच्या आदेशानुसार तक्रारदार आणि मूळ मालक यांना संबंधित मुद्देमाल देण्याचा कार्यक्रम पोलीस मुख्यालयात मंगलम हॉलमध्ये शुक्रवारी घेण्यात आला.
याप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.